वाघाळा गावा मध्ये नागठाना संस्थे तर्फे रंनिंग स्पर्धेचे आयोजन

Wed 09-Oct-2024,05:10 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:निखिल बावणे वर्धा

 

 

 

गाव वाघाळा - काल नागठाणा शिक्षण क्रीडा प्रसारक बहुद्देशीय संस्था जिल्हा वर्धा यांच्यातर्फे वघाडा या गावांमध्ये रनिंग स्पर्धेचे आयोजन केल्या गेले होते. या आयोजनाचे आयोजक होते प्रवीण भाऊ भलावी व मित्रपरिवार. या रनिंग स्पर्धेमध्ये 14 वर्षाच्या आतील वयोगटांमध्ये मुलं तसेच दहा वर्षाच्या आतील वयोगटातील मुलं होते या रनिंग स्पर्धेचे वैशिष्ट्ये होते या रनिंग स्पर्धेमध्ये सर्वात जास्त ज्यांनी स्पर्धक होते ते कमी वयाचे होते व त्यांना नवीन प्रकारे काहीतरी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. नागठाणा क्रीडा प्रसारक संस्था यांच्यातर्फे दरवेळेस अशा प्रकारे अनेक कार्यक्रम केले जातात. या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे या स्पर्धकांना पारितोषिके सुद्धा दिल्या जातात. या स्पर्धेमध्ये सुद्धा स्पर्धक होते त्यांना पारितोषिकमध्ये एक मेडल प्रमाणपत्र व 500 रुपये 300 रुपये अशा प्रकारचे रोख बक्षीस देण्यात आले या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे स्पर्धक होते त्यामध्ये पारितोषिक मिळण्यात आले. आठ जणांना आणि हे आठ जण स्पर्धकांमध्ये खूप छान प्रकारे यांनी आपलं स्पर्धा केली आहे. ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठ्या सहभागाने गावकरी मंडळी उपलब्ध होते आणि या स्पर्धेला सुद्धा पाठिंबा संपूर्ण गावाचा होता प्रवीण सराटे सर जे नागठाणा क्रीडा संस्था चे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही स्पर्धा फक्त सुरुवात आहे या प्रकारच्या अनेक स्पर्धा आम्ही गावोगावी जाऊन घेऊ. त्यामुळे लोकांना क्रीडाचे, स्पर्धेचे, रनिंगचे व फिजिकल चे त्यांच्यामध्ये नवीन प्रकारे ऊर्जा निर्माण होणार व ते ह्या प्रती जागृत होणार व पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी सामोरे येणार गावातील मुलं आणि यांची एक फिजिकल अकॅडमी सुद्धा आहे त्या अकॅडमी मध्ये प्रवीण सराटे सर हे खूप विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देत असतात. आणि या नागठाणा अकॅडमीचे जे सचिव आहेत शाम वालके सर उपाध्यक्ष निखिल बावणे सर हे अशाच प्रकारे अनेक कार्यक्रम घेत असतात व मुलांना वाव मिळण्यासाठी त्यांना एक स्टेज मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात.